Karwar Collector : गोव्याला जात असाल, तर थांबा! 'हा' घाटमार्ग तीन महिन्यांसाठी राहणार बंद

बेळगावकडून येणाऱ्या वाहनांना चोर्ला घाटमार्गे (Chorla Ghat) गोव्याला जावे लागणार आहे.
Anmod Ghatmarg on Goa National Highway
Anmod Ghatmarg on Goa National Highwayesakal
Updated on
Summary

कर्नाटक तसेच गोवा राज्यांतील नागरिक या मार्गावर अवलंबून असून, वैद्यकीय सेवांसाठी स्थानिक लोकांना गोव्याकडे जावे लागते.

खानापूर/ रामनगर : गोव्या (Goa) दरम्यानच्या राष्ट्रीय मार्ग रस्ता क्र. ४ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड रस्त्यावरील (Anmod Ghat) अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे. तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे धारवाडहून (Dharwad) जाणाऱ्या वाहनांना आळणावर, हल्ल्याळ, यल्लापूर, अकोलामार्गे कारवारला आणि पुढे गोव्याला जावे लागणार आहे.

तर, बेळगावकडून येणाऱ्या वाहनांना चोर्ला घाटमार्गे (Chorla Ghat) गोव्याला जावे लागणार आहे. या आदेशानुसार सहाचाकी किंवा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांना पाऊस संपेपर्यंत रामनगरहून जाता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवार (ता. ११) जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा मार्ग बंद राहणार आहे.

Anmod Ghatmarg on Goa National Highway
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! कास पठारावर पावसाळी पर्यटन झाले सुरू; एका व्यक्तीला किती रुपये द्यावे लागणार शुल्क?

कर्नाटक तसेच गोवा राज्यांतील नागरिक या मार्गावर अवलंबून असून, वैद्यकीय सेवांसाठी स्थानिक लोकांना गोव्याकडे जावे लागते. उपजीविका करणाऱ्यांवर उपवासमारीची वेळ आली आहे; परंतु गोवा राज्यात जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने रुग्णांनाही मनस्ताप झाला आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्यात येणार नसतानाही कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता बंदचा निर्णय चुकीचा असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com