
-विजय लोहार
नेर्ले: अण्णा भाऊ साठे यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षाचं होतं आणि त्याच वाटेवरून चालत असलेल्या त्यांच्या कुटुंबाला अखेर हक्काचं घर मिळालं. आमदार रोहित पवार यांनी दिलेला शब्द तडीस नेत एका वर्षात नव्या वास्तूचं स्वप्न साकार केले. घराचं स्वप्न साकार होताच संघर्षमय जीवन जगणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.