अण्णा हजारे यांचे उपोषणानंतर राळेगणसिद्धीत स्वागत

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 2 एप्रिल 2018

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथून राळेगणसिद्धी येथे आगमन होताच उपस्थीत ग्रामस्थांनी व महिलांनी फुले उधळून हजारे यांचे स्वागत केले. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथून राळेगणसिद्धी येथे आगमन होताच उपस्थीत ग्रामस्थांनी व महिलांनी फुले उधळून हजारे यांचे स्वागत केले. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

हजारे गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी प्रथम येथील यादवबाबा मंदीरात यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतरच त्यांनी उपस्थीत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या रेट्यापुढे तसेच देशभरातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला जनतेच्या दबावापुढे झुकावे लागले. या आंदोलन मुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळाला तर देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील मात्र त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल असेही हजारे म्हणाले. हा लाभ संबध देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

हजारे यांनी ग्रामस्थांनी माझ्या आंदोलनाच्या काळात सलग सात दिवस गावात विविध प्रकारची आंदोलने केली त्यामुळे सरकार झुकले आहे. एका गावाची शक्ती किती अफाट असते ते या आंदोलनातून समाजाला दिसून आले आहे. या वेळी हजारे यांनी केलेल्या आंदोलनाबाबत व सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.     

हजारे पुढे म्हणाले, सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसे लेखी पत्र पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांची सध्या स्थिती अतीशय वाईट झाली आहे. त्यांना न्याय मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने शेतीत नुकसान होते. त्या मुळे तो आत्महत्या करतो. शेतात राबतो त्याला योग्य बाजारभाव मिळाला पाहीजे तर तो शेतकरी करतो या पुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही.

हजारे आज दिल्ली येथून दुपारी 12 वाजता राळेगण सिद्धी येथे पोहचले, प्रथम यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतर उपस्थीतांशी सवांद साधला. गेली सात दिवस हजारे दिल्ली येथील रामलिला मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसले होते.     

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकरा्यांना पेऩ्शन मिळावी, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची तात्काळ अंमल बजावणी करावी तसेच निवडणुक कायद्यात सुधारणा करावी या मागण्यासाठी 23 मार्च हजारे बेमुदत उपोषणास बसले होते. गुरूवारी (ता. 29 ) केंद्रीय कृषी मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर व पंतप्रधन कार्यालयाने मागण्यांबाबत लेखी अश्वासन दिल्या नंतर सातव्या दिवशी हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र त्यांना खूप थकवा जाणवत असल्याने त्यांनी काल शुक्रवारी महाराष्ट्र सदनला एक दिवस आराम करणे पसंत केले, आज शनिवारी सकाळी दिल्ली येथून ते थेट राळेगणसिद्धी येथे दुपारी पोहचले.     

आज सायंकाळी आठ वाजता राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन केले असून या ग्रामसभेत हजारे यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनात हजारे यांना य़श मिळाले म्हणून व आमचे दैवत सुखरूप परतले या निमित्ताने गावात ग्रामसभेत पेढे वाटप करूण आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: anna hajare welcomed by villagers of ralegansiddhi after hunger strike