राळेगणसिद्धीत अण्णांचे मौन सुरू

Anna's silence begins in Raleigh
Anna's silence begins in Raleigh
Updated on

पारनेर (नगर) ः निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास तातडीने करून त्याबाबतची सुनावणी वेगाने करून निकाल त्वरित द्यावा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवर हेल्पलाइन ठेवावी, महिलांवरील अन्यायाच्या घटनांचा तपास महिला अधिकाऱ्यांनीच करावा या आणि अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळपासून राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात मौन आंदोलन सुरू केले. 

हजारे यांनी आज सकाळी संत यादवबाबा व विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. साडेअकराच्या सुमारास यादवबाबा मंदिरात मौन आंदोलनास सुरवात केली. सध्या देशभरात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. मात्र, या घटनांचा तपास अतिशय विलंबाने होतो. न्यायदानात होणारा विलंब हेच खरे जनतेच्या नाराजीचे कारण आहे. त्यासाठी अशा प्रकरणाचे निकाल वेगाने होणे गरजेचे आहे. महिलांवर अत्याचार होतात तर अशा प्रकरणाच्या तपासी अधिकारीही महिलाच असाव्यात. या आंदोलनाची दखल न घेतल्यास उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही हजारे यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिला. 

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींनासुद्धा अद्यापि फाशी दिली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे धाडस वाढत असल्याचेही हजारे म्हणाले. तसेच, 2012 पासून संसदेत कायदा प्रलंबित आहे. असा कायदा झाला, तर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होणार आहे. 

आंदोलने हिंसक नको 
राष्ट्रीय नागरिकत्वाच्या कायद्याविरोधात सध्या देशभरात हिंसक मार्गाने सुरू असलेली आंदोलने चुकीची आहेत. सरकारविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. मात्र, ती आंदोलने शांततेच्या व अहिंसक मार्गाने केली पाहिजेत. मी गेली 30 वर्षे आंदोलने करीत आहे. मात्र, सर्व आंदोलने अहिंसक व शांततेच्या मार्गाने केली आहेत. हिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनात होणारे नुकसान हे राष्ट्रीय संपत्तीचे असले, तरी ते पर्यायाने आपले म्हणजे जनतेचेच नुकसान असते, असेही हजारे या वेळी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com