सांगली : शेती औषध कंपनीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा निरीक्षण अहवाल देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना कृषी विभागातील (Agriculture Department) जिल्हा गुणवत्ता निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti-Corruption Department) जाळ्यात रंगेहाथ सापडला. संतोष रंजना राजाराम चौधरी (वय ४६, सध्या रा. गणेश नमन अपार्टमेंट, दालचिनी हॉटेलसमोर, धामणी रस्ता, विश्रामबाग, मूळ रा. गलांडेवाडी नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल दुपारी ही कारवाई केली.