लाचलुचपतची धडक कारवाई; लेखाधिकारी कार्यालयातील दोघेजण जाळ्यात

या कारवाईनंतर प्रशासकीय इमारतीमध्ये खळबळ उडाली होती.
bribe 123.jpg
bribe 123.jpg

सांगली : निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लेखाधिकारी बाबासो महादेव जाधव (वय ३८, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व कनिष्ठ लेखापरीक्षक बबन रामचंद्र कोळी (वय ५७, रा. इनाम धामणी, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली. (arrested in sangli) विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील लेखाधिकारी, लेखापरीक्षण पथक शिक्षण विभागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात लाचखोरीची चर्चा रंगली होती. (anti corruption case)

bribe 123.jpg
जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचे बिगुल सप्टेंबरमध्ये वाजणार?

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची निवडश्रेणी पडताळणी स्टॅम्पिंगसाठी व त्यांचे मित्र यांची वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पिंग मिळण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कार्यालयातील लेखाधिकारी जाधव व कनिष्ठ लेखापरीक्षक कोळी यांनी निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच मागितल्यानंतर तक्रारदारांनी ५ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा जाधव व कोळी या दोघांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

bribe 123.jpg
मोदीजी सीमावासीयांच्या व्यथा जाणा ! सीमाभागातून पाठविली 50 हजार पत्रे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सापळा रचला. तेव्हा तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागून ती रक्कम स्वीकारताना जाधव व कोळी या दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर प्रशासकीय इमारतीमध्ये खळबळ उडाली होती. लाचप्रकरणी जाधव व कोळी या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, संजय संकपाळ, भास्कर भोरे, प्रितम चौगुले, सीमा माने, वीणा जाधव, राधिका माने, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com