ऍन्टीजेन टेस्ट वाढल्या! शहरात 78 पॉझिटिव्ह अन्‌ चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Tuesday, 28 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 31 हजार 597 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत चार हजार 785 कोरोनाबाधित रुग्ण आढळले 
  • आज शहरात सापडले 78 कोरोना पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू 
  • एकूण मृतांची संख्या 352; दोन हजार 904 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत एकूण चार हजार 785 रुग्णांपैकी तब्बल दोन हजार 904 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे 352 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सोमवारी (ता. 27) केलेल्या 926 ऍन्टीजेन टेस्टमध्ये 78 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चौघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल महापालिकेने आज दिला. 

 

सोलापुरातील स्वामी विवेकानंद नगर (होटगी रोड), सिंधू विहार, सैफूल, द्वारका नगर, संजय गांधी नगर, कोळी वस्ती (विजयपूर रोड), एलआयसी कॉलनी, मंत्री चंडक, भवानी पेठ, शुक्रवार पेठ, थोबडे नगर, सायली अपार्टमेंट, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), समर्थ चौक, महाविर हौसिंग सोसायटी, सेटलमेंट फ्री कॉलनी, झोपडपट्टी क्रमांक एक (गांधी नगर), मार्कंडेय नगर, मल्लिकार्जुन नगर, थोबडे वस्ती, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), जुने गावठाण (बाळे), दक्षिण कसबा, शुक्रवार पेठ, श्रध्दा अपार्टमेंट (नवी पेठ), म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर, योगीराज नगर (माशाळ वस्ती), शेटे नगर, दत्त नगर, योगायोग नगर (शेळगी), जुना विडी घरकूल, हत्तुरे वस्ती, भारतमाता नगर, हत्तुरे नगर (विमानतळाजवळ), दमाणी नगर, गवळी वस्ती, शांती नगर (नई जिंदगी), मंजुषा सोसायटी (विकास नगर), निमल नगर (एमआयडीसी), साई नगर, शंकर नगर, बसवेश्‍वर नगर या ठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

'येथील' चार रुग्णांचा मृत्यू 
हत्तुरे वस्ती परिसरातील मल्लिकार्जुन नगरातील 55 वर्षीय महिलेचा, शेळगी परिसरातील 60 वर्षीय पुरुष, विद्या नगर परिसरातील 60 वर्षीय पुरुषाचा आणि थोबडे नगर परिसरातील 58 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

ठळक बाबी... 

  • शहरातील 31 हजार 597 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत चार हजार 785 कोरोनाबाधित रुग्ण आढळले 
  • आज शहरात सापडले 78 कोरोना पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू 
  • एकूण मृतांची संख्या 352; दोन हजार 904 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Antigen tests increased solapur city today in the 78 positive and four deaths