Anupam Pan Shop Story : पान खायचा (Pan Masala) मूड झालाय? सांगलीत एसटी स्टँड रोडच्या बापट बाल शाळेच्या पूर्व बाजूला ‘अनुपम पान शॉप’ आहे, तिथं पान खा... चघळता-चघळता तिथे लावलेला फलक वाचून काढा. तुम्ही खात असलेल्या पानाचं ‘पान’ पुराण तुम्हाला कळेल. सन १९८० ला सिकंदर महंमद मुजावर यांनी हे पान शॉप सुरू केलं. त्यांनी पानाची महती सांगणाऱ्या मजकुराचं लाकडी फलकावर लेखन केलं.