esakal | साखर कारखानदारी टिकवण्याचे आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

sahkar karkhana

साखर कारखानदारी टिकवण्याचे आवाहन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा: 
बाळासाहेबांकडून उंचावल्या अपेक्षा;मोहिते,उंडाळकर,भोसलेंनीही गाजवली कारकीर्द सहकार क्षेत्रापुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असताना पालक मंत्री पदाची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.सहकारी साखर कारखाने अडचणीत असून,पतसंथांच्या ठेवीवर १० टक्के अभिभार लावण्यास विरोध होत आहे. 
तर रिसर्व बँकेकडून सहकारी बँकांवर नैर्बंध आणून त्यांचे स्मॉल फायनान्स मध्ये रूपांतरणाच्या प्रक्रिया सुरु असून,नयम मंडळाच्या माध्यमातून सहकारी संस्थांवर नियंत्रण आणण्यात यर्त आहे.या सर्व आव्हानाला तोंड डेट्राज्यातील सहकाराला उर्जितावस्था देण्याचे आव्हाहन नवे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील याना पेलावे लागणार आहे. 

"तिळगुळ दरात वाढ न झाल्याने संक्रांत गोड"
राज्यात सहकारी क्षेत्राचा पाय यशवंतराव चव्हाण यांनी रोवला.त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी सहकार क्षेत्राला ताकद दिली.यामध्ये यशवंतराव चव्हाण,किसन वीर,यशवंराव मोहिते,बाळासाहेब देसाई,रघुनाथ पाटील,विलासराव पाटील-उंडाळकर,(कै)अभयसिंह राजे भोसले यांचा समावेश आहे.या नेत्यांनी राज्यात सहकारी क्षेत्राला उभारी देतानाच जिल्ह्यात सहकाराचा पाय मजबूत करण्याचे काम केले. यशवंतराव मोहिते सहकारमंत्री असताना सर्वाधिक चांगले काम सहकार क्षेत्रात झाले . 

दिग्गज नेत्यांचे अनुकरण होणार 
आजपर्यंत झिल्यातील दिग्गज नेत्यांनी सहकार क्षेत्रात चांगल्या कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविला आहे.त्याच नेत्यांच्या पावलावर पॉल ठेवून मंत्री बाळासाहेब पाटील याना क्षेत्राला ताकद देण्याचे काम करावे लागणार आहे.(कै)अभयसिंहराजे भोसले यांनी सहकार  क्षेत्रात आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटवत अजिंक्य उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ रोवली,तसेच ते सहकार मंत्री असताना त्यांनी आपल्या कार्यकर्तुतवाच्या जोरावर सहकारी संस्थान ताकद देण्याचे काम केले.त्यामुळे या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेब पाटील राज्याच्या सहकाराला गती देण्याचे काम करतील,अशी अपेक्षा जिल्ह्यातील सहकारातील तज्ञांकडून व्यक्त होत. 
सहकारी बँकांचे  रूपांतरण 
नियामक मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून सहकारी संस्थानांवर नियंत्रण ठेवण्याचे पॉल रिझर्व्ह बँकेने उचले आहे,तसेच बंद पडलेले सहकारी दूध संघ,सहकारी सूट गिरणी याना उर्जितावस्था देण्याचे मोठे आव्हाहन मंत्री पाटील यांच्यापुढे आहे. 


"यल्लम्मा डोंगरावर आला भाविकांचा पूर...

loading image