esakal | आरेवाडीची बिरोबा यात्रा रद्द:बकरे कापल्यास  होणार कठोर कारवाई; तहसीलदारांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Arewadi Biroba festival canceled sangli marathi news

आरेवाडी येथील बिरोबा बनातील भक्त निवास मध्ये प्रशासन, देवस्थान समिती व पुजारी यांची संयुक्त बैठक पार पडली.

आरेवाडीची बिरोबा यात्रा रद्द:बकरे कापल्यास  होणार कठोर कारवाई; तहसीलदारांचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढालगाव  (सांगली): आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोणीही गर्दी जमवून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला व कसलेही दुकान उघडे ठेवले, बकरे कापले तर कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, असा इशारा तहसीलदार बी. जे. गोरे यांनी दिला. 

आरेवाडी येथील बिरोबा बनातील भक्त निवास मध्ये प्रशासन, देवस्थान समिती व पुजारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाने उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराद्य दैवत श्री बिरोबा देवाची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावाने सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याची वेळ आली आहे. बिरोबा देवाची यात्रा पाडव्यापासून सुरू होते. पाडव्याच्या सातच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. यात्रास्थळी दरवर्षी सुमारे चार लाख भाविक हजेरी लावतात. 

सुमारे दहा हजार बकरी कापली जातात. 
तहसीलदार गोरे यांनी सांगितले आजपासून मंगळवार (ता.6) एप्रिल मंदिराच्या आवारात असणारी सर्व नारळाची व इतर दुकाने तातडीने बंद करा, मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद ठेवा, देवाच्या विधिसाठी फक्त पाच व्यक्तींनाच मंदिरात थांबता येईल. मंदिर बंद असल्याचे चारी बाजूंना फलक लावा, बकरी कापण्यास मनाई आहे. येणारी अमावास्याही भरवली जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटील, गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांची असेल.

हेही वाचा- गडहिंग्लज व राधानगरीसाठी निधी मंजूर; 13 गावांचा समावेश

यात्रेच्या मुख्य दिवशीच फक्त विधिसाठी पाच पुजाऱ्यांना परवानगी आहे. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, सरपंच आबासाहेब साबळे, कोंडीबा कोळेकर, गावकामगार तलाठी कल्पना आंबेकर, उपसरपंच बिरू कोळेकर, दादा कोळेकर यांच्यासह पुजारी उपस्थित होते. 

संपादन- अर्चना बनगे

loading image