
सांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरातील चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. ४८ तासांत रेकॉर्डवरील चोरट्याचा मुसक्या आवळत दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड किलो चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. पोलिसांच्या याबद्दल फिर्यादी मंदिरातील पुजारी यांनी कौतुक केले. अक्षय अर्जुन मोरे (वय २७, गोंदीलवाडी रेल्वे गेट, पलूस आमणापूर रस्ता, ता. पलूस) असे त्या संशयितांचे नाव असून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व दुचाकी असा ९ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.