आरगेच्या शुभमने सलग ८१ तास स्केटिंग करून नोंदविला विक्रम ........!

आरगेच्या शिरपेचात मानाचा तुरा ; स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
belgaum
belgaumsakal

आरग : बेळगाव कर्नाटका येथील शिवगंगा स्केटिंग रोलर क्लब यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत सलग ८१ तास स्केटिंग करून शालेय विद्यार्थ्यांने जागतिक विक्रम नोंदवला.मूळ गाव आरग येथील शुभम रमेश जाधव असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने एशियन - युनियन बुक ऑफ रेकॉर्डसह अन्य आठ स्थरावर या विद्यार्थ्याची विक्रमी नोंद करण्यात आली.

belgaum
निकाल लागून दोन वर्ष उलटली तरी, राज्य कर निरीक्षकांना अद्याप नियुक्ती नाही

त्याच्या या यशाने आरगेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शुभमने मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे. तसेच या वर्षाच्या सुरुवातीस गोवा येथे झालेल्या मिशन ओलंपिक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धात शुभमने राष्ट्रीय दोन कास्य पदक मिळवले. शुभमला लहानपणापासूनच स्केटिंग खेळण्याची आवड आहे.त्याने एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, युनियन बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड, बेस्ट इंडिया रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन, एस्ट्रीम रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, चिल्ड्रन रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड या ठिकाणी सलग ८१ तास स्केटिंग केल्याने विक्रमी नोंद करण्यात आली.आरग हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेतो. त्याचे आई वडील शेती व्यवसाय करतात.या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. आईवडिलांची मोठी साथ मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com