Video : शिका अवघ्या काही सेकंदात कलिंगड कापण्याची कला

Video : शिका अवघ्या काही सेकंदात कलिंगड कापण्याची कला

सातारा ः उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे घरोघरी सध्या द्राक्ष, कलिंगड, टरबूज, खरबूज अशी रसदार फळे खाल्ली जात आहेत. बाजारात मिळणारी कलिंगड घरी आणल्यानंतर त्या वेगवेगळ्या प्रकारे कापून सजवून त्याचा आस्वाद घ्यावा आपणास वाटत असते. यावेळी कलिंगडची चव लोकांच्या जिभेला अधिकच आवडते. त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात. हे शरीरातील पाण्याची कमतरता देखील भरुन काढतं. कलिंगडमध्ये 90 टक्‍क्‍यापर्यंत पाणी असतं. कलिंगड खाणं हे जवळपास प्रत्येकालाच आवडतं. परंतु ते योग्यरित्या कापण्यात बऱ्याचदा अडचणी येतात. आपल्याला देखील अशाच प्रकारची समस्या येतात. कलिंगड कापण्याच्या काही टिप्स तुम्हांला खूप उपयुक्त ठरू शकतात. 

आता कलिंगडचा पूर्ण उपयोग? असतं काय त्यात विशेष? लाल लाल गर कापायचा- खायचा- संपलं! तर आता कलिंगड कापण्यापासून सुरुवात करूयात. विक्रीच्या ठिकाणी अर्धे किंवा नक्षीदारपणे कापून ठेवलेली लाल भडक फळे पाहून आपल्याला ती खूप आवडतात आणि आपण एक छानसं फळ विकत घेऊन घरी आणतो. कापल्यावर आपली थोडीशी निराशा होते. कापलेलं फळ तितकंसं लाल असतंच असं नाही. इथं बाजारातल्या फळाच्या लाल रंगामागचं विज्ञान लक्षात घ्या. विक्रीच्या ठिकाणी कापून ठेवलेलं फळ तीन-चार तास तरी आधी कापलेलं असतं. आता एक लक्षात घ्या. कोणत्याही वस्तूवर वातावरणातल्या ऑक्‍सिजनचा परिणाम सुरू असतो. त्याला ऑक्‍सिडेशन म्हणतात. कापलेलं सफरचंद थोडया वेळाने रंग बदलू लागतं हे आपण अनुभवतोच. तोच परिणाम बाजारातल्या कापून ठेवलेल्या कलिंगडावरही झालेला असतो. आणि म्हणून ते लाल भडक दिसत असतं. तुम्हाला धीर असेल तर कलिंगड कापल्यावर पंख्याखाली ठेवा. गारही होईल आणि अधिक लालही. 

आता प्रत्यक्ष कापण्याला सुरुवात. आता कापण्यात काय विशेष? घेतली सुरी आणि केले आपल्याला हवे तसे तुकडे. तर तसे नाही. ही पद्धत अवंलबून पाहा. म्हणजे तुम्हाला त्यातले इंगित कळेल. आणि घरभर पसरलेल्या बिया आवरण्यापासूनही सुटका होईल. 

चांगली धारदार सुरी घ्या. फळ आडवं किंवा उभं धरून त्याच्या दोन फाकी करा. आडवं कापलं असेल तर एक गोल बांगडीसारखी बियांची रचना, तर उभं कापलं असेल तर लांब वर्तुळाकार, बोटीसारखी रचना दिसेल. आता सुरी या बियांच्या रांगेच्या एका टोकाला खाली पांढऱ्या भागापर्यंत उभी घाला आणि संपूर्ण बियांच्या जो गोल किंवा लंबवर्तुळाकार रचना आहे तशी गोल फिरवा. एक शंकूच्या किंवा पिरॅमिडच्या आकाराचा किंवा उभं कापलं असल्यास बोटीच्या आकाराचा लपका फळांपासून वेगळा होईल. हा अलगद उचलून पसरट भाग ताटलीला लागेल असा ठेवा. आता या दोन्ही भागांवर आणि खाली राहिलेल्या फळाच्या भागावर काळ्या बियांची रांगच्या रांग दिसेल. ह्य सर्व बिया सुरीच्या टोकाने सुटया करून एका वाटीत गोळा करा. आणि सांभाळून ठेवा. टाकू नका. 

आता हा त्रिशंकूच्या किंवा बोटीच्या आकाराच्या बियाविरहित रसदार गोळा तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचा! उरलेल्या फळाचे आवडीप्रमाणे बेतशीर तुकडे करा. लाल भाग सुटा कापून त्याचेही लहान तुकडे करून टोचणी चमच्याने सजवून खायला द्या. 

किचन + : वॉटरमेलन कटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com