कोरोना हद्दपार होऊ दे, पाऊस पडू दे ...वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत आषाढी एकादशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

संख (सांगली)- नित्यनियमाने पायी दिंडीने पंढरपूरला आषाढी वारीला जाणारे चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी चिकलगी भुयार मठाच्या परिसरात आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपन केले तसेच वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. यावेळी पायी दिंडीने चिकलगी येथे आलेल्या वारकऱ्यांचा सत्कार तुकाराम बाबा महाराज यांनी केला.

संख (सांगली)- नित्यनियमाने पायी दिंडीने पंढरपूरला आषाढी वारीला जाणारे चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी चिकलगी भुयार मठाच्या परिसरात आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपन केले तसेच वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. यावेळी पायी दिंडीने चिकलगी येथे आलेल्या वारकऱ्यांचा सत्कार तुकाराम बाबा महाराज यांनी केला.

सोशल डिस्टन्सचे पालन करत चिकलगी येथे आषाढी एकादशी भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी आदटराव गुरुजी, राठोड गुरुजी, मल्लेश हत्ताळी, शिवराय महाराज, काशीराम चौगुले, सिद्धराय उमराणी, भुयारी मठाचे पुजारी, श्री. निंबोनी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*यंदा महामारी ने चुकलीया वारी, येऊ शकलो नाही तुझ्या दारी 
दुःख वाटते मनात, ओढ लागे जिव्हारी 
एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी 
पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे घरोघरी* हीच ओढ मनी धरत मंगळवेढा तालुक्‍यातील मारोळी , चिकलगी, निंबोणी, जत तालुक्‍यातील लवंगी,जाडरबोबलादबलाद येथील भक्तांनी पंढरपूरला जाणे शक्‍य नसल्याने जवळच असलेल्या चिकलगी भुयार मठ येथे जावून पांडुरंगाचे दर्शन घेत कोरोना हद्दपार होऊ दे, पाऊस पडू दे असे साकडे घातले. 

आषाढी एकादशीला यंदा कोरोनामुळे पंढरपूरला जाता न आल्याने चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी चिकलगी येथील मठाच्या परिसरात वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपण केले. चिकलगी येथे पायी दिंडीत आलेल्या वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करत बाबांनी वारकऱ्यांना आषाढी दिनी झाडे भेट देत आपल्या परिसरात वृक्षारोपण करा व ही झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला. 
चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी पायी आलेल्या भक्तांचा यथोचित सत्कार केला.

माणुसकी जपण्याचे केले आवाहन 
कोरोनात दक्षता घ्या व या कठीण काळात माणुसकी जपा असे आवाहन करून चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मागील तीन महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोनामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या कठीण परिस्थितीत श्री संत बागडेबाबा यांच्या आशीर्वादाने आपण दुष्काळी जत तालुक्‍यात हजारो कुटूंबियांना जिवनावश्‍यक कीट, भाजीपाला वाटप केला तसेच जनजागृती केली. श्री संत बागडेबाबांच्या भक्तांनी या कठीण काळात माणुसकी जपत एकमेकांना सहकार्य करण्याचा भाव मनी ठेवावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashadi Ekadashi resolves to plant trees and cultivate trees