म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी केला या युवकाला फोन

निवास चौगले 
Thursday, 9 January 2020

मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

कोल्हापूर  ः मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे.

आज राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी आपल्याकडे आपला कार्यभार स्विकारला. श्री. चव्हाण यांनीही आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्‌विटचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil