Two-wheeler Dumper Accidentesakal
पश्चिम महाराष्ट्र
ईदचा चंद्र त्यांच्या नशिबी नव्हताच! हमारे बच्चे.. उनके पप्पा कहाँ है? जखमी महिलेने विचारत-विचारत घेतला अखेरचा श्वास
Ashta Accident : ईदच्या खरेदीसाठी बुधवारी (ता. २६) दुचाकीवरून निघालेल्या अश्फाक पटेल यांचा आष्टा येथे अपघात झाला. असद व अश्रफ या दोन लेकरांसह अश्पाक यांचा मृत्यू झाला. मुलांची आई हसीना अत्यवस्थ होती.
Summary
रमजानच्या पवित्र महिन्यात आणि ईद तोंडावर असताना तिचं असं जाणं सर्वांना चटका लावणारं ठरलं. कुंडलवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इटकरे, आष्टा : ‘हमारे बच्चे... उनके पप्पा... कहाँ है..? मुझे उन्हे देखना है...’ ‘ती’ सतत विचारत होती. तिला काय सांगावं, कुणाला दाखवावं, कसं दाखवावं? ‘त्या’ तिघांनाही हे जग सोडलेलं. तीही चौकशी करून थकली. तिनंही आज अखेरचा श्वास घेतला. ईदच्या (Ramadan Eid) खरेदीसाठी निघालेलं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. गेले आठवडाभर गावावर दाटून आलेली शोककळा आज आणखी गडद झाली.
