esakal | अपक्ष-सत्ताधारी-विरोधकांचा जमला मेळा;चर्चांना उधान
sakal

बोलून बातमी शोधा

अपक्ष-सत्ताधारी-विरोधकांचा जमला मेळा; चर्चांना उधान

अपक्ष-सत्ताधारी-विरोधकांचा जमला मेळा; चर्चांना उधान

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आष्टा (सांगली) : आष्टा नगरपालिकेच्या (ashta municipal corporation)सत्ता सारीपाटावर विकास कामांचे भूमिपूजन प्रारंभ सोहळे झाले. सत्ताधारींच्या या सोहळ्यात अपक्ष विरोधकांचा मेळा जमल्याचे चित्र होते. कोणी पदासाठी, कोणी जनतेच्या कामात, कोणी ठेकेदारीत तर कोणी टक्केवारीत मेळ साधित आहेत. अपक्षांसह विरोधकांची सत्ताधाऱ्यांशी वाढणारी सलगी शहरात चर्चेचा विषय बनत आहे ही सलगी जनतेला कितपत रुजतेय हे आगामी पालिका निवडणुकीत उमजेल तूर्तास जो होगा देखा जायेगा असा सूर नागरिकांतून उमटत आहे.(ashta-municipal-corporation-observation-of-municipal-elections-sangli-political-news)

पालिकेत स्व. विलासराव शिंदे व मंत्री जयंत पाटील गटाची एकत्रित सत्ता आहे. सत्तेच्या चाव्या शिंदे गटाच्या हाती आहेत. स्व. विलासराव शिंदे यांचा शब्द अंतिम मानून व तत्कालीन सल्लागार अभियंते सांगतील तसाच इथला कारभार चालायचा विलासरावांच्या पुढे ‘ब्र’ शब्द काढायचे धारिष्ट्य करभाऱ्यांच्यात नव्हते नव्हे तर त्यांच्याच कृपाशीर्वादाने निवडून आल्याची मौखिक कबुली काही कारभारी देत होते. हे खरे असले तरी सभागृहात माना डोलावणे विषयांना मंजुरी देणे पर्यंतच कारभाऱ्यांचे योगदान काम असायचे. जनतेच्या, प्रभागाच्या समस्यांच सोयरसुतक कधी त्यांना वाटलंच नसाव, समिती सभापती अन्‌ उपनगराध्यक्षपद यासाठीच कारभाऱ्यांचा अस्सली कारभार दिसायचा. अपक्षांनी तर नूरच उलटवला अपक्ष विजयी झालेल्या जगन्नाथ बसुगडे, सारिका मदने यांनी सभापतीपदाच्या आश्‍वासनावर सत्ताधाऱ्यांना साथ दिली.

हेही वाचा- जमिनीतच ‘लष्करी’हल्ला; शेतकरी हताश

अपक्ष तेजश्री बोंडे यांनी चार वर्षे प्रशासनाला धारेवर धरले, चर्चांना वाचा फोडली. पालिकेतील कोणत्याही समितीच्या सदस्य नसणाऱ्या या सदस्य होत्या. प्रत्येक सभा त्या प्रश्नावली उभी करीत, पण त्यांचीही सत्ताधाऱ्यां‍च्यात उडी पडली. समितीची सदस्य नसणाऱ्या बोंडे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली अन्‌ इथं अपक्षांचा पालिकेतील विरोध संपला. लोकशाही मार्गाने विरोधक ठरलेल्यांनी तर कहरच केला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा यांनी आपापसातच द्वंद सुरू केले. यातून नगरसेविका पुत्राने पालिकेत टक्केवारी अन्‌ मित्र नातलगांच्या नावे ठेकेदारीचे निशान रोवल्यांच्या चर्चांना उधाण आले नव्हे तर प्रखर विरोध करणाऱ्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांची री ओढनी सुरू केली.

नगरसेविका पुत्राचा पालिकेतील वावर अधिकाऱ्यांशी सलगी जनतेत जायचा तो संदेश गेला, पण यातून विरोधकांची ताकद क्षीण झाली, पैकी दोघांचा विरोध काहीसा दिसतोय. शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा दर्जा निकृष्ट असूनही विरोधक मात्र मूग गिळून गप्प असल्याचेच चित्र सध्यातरी आहे. अपक्ष व काही विरोधकांना आपलस करण्यात सत्ताधारी यशस्वी झाले; पण सत्ताधारी गटात ही ठेकेदारी टक्केवारी वरून वादळ उठले. यात नगराध्यक्षांच्या नावाचीही चर्चा रंगली. चर्चेला शिंदे गटातील कारभाऱ्यांनीच तोंड फोडले, नव्हे तर आम्हालाही ठेकेदारीत सहभागी करा, असा सूर पालिका वर्तुळात उभा केला. सहा महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे कारभारी ठेकेदारीचे मालक हा सूर पेट घेत असतानाच मंत्री पाटील यांच्याकडून पाच कोटींचा विकास निधी प्राप्त झाला ‘विकासाचे वाटेकरी आम्ही’ हा आग्रह मंत्रिगटाच्या काहींनी पुढे आणला. त्या वाटेवरच ठाण मांडला.

loading image