esakal | जमिनीतच ‘लष्करी’ हल्ला; शेतकरी हताश,पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनीतच ‘लष्करी’ हल्ला; शेतकरी हताश,पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका

जमिनीतच ‘लष्करी’ हल्ला; शेतकरी हताश,पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका

sakal_logo
By
सदाशिव पुकाळे

झरे (सांगली) : तालुक्यात यावर्षी मक्‍याचा पेरा १५५० हेक्टरवर झाला आहे. जमीन पातळीवर असलेल्या मक्यावर लष्करी आळीचा जोरात हल्ला सुरू आहे. शेतकरी वेगवेगळ्या फवारण्या करीत आहेत, तरीही अळी हटेना, अशी स्थिती आहे.

पंधरा दिवस, महिन्यांपूर्वी मका पेरणी झाली. काही पिक भांगलणीला आलेय. पिक लहान असतानाच लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. वेगवेगळ्या कीटकनाशकांचा प्रयोग सुरू आहे. लष्करी आळीचे प्रमाण जास्त आहे. औषधाचा परिणाम म्हणावा तसा नाही. सध्या तरी कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून मका लागवडीकडे पाहिले जात आहे. शेतकरी मका पिकाकडे वळला आणि चार पैसे मिळू लागले, परंतु प्रादुर्भावाने पीक उद्ध्वस्त होऊ लागले आहे.

भविष्यात या संकटामुळे मक्याची लागवड कमी प्रमाणात होण्याचा धोका आहे. दहा वर्षांपूर्वी सर्वच शेतकरी चार पैसे मिळण्यासाठी कापूस पिक घेत. परंतु निकृष्ट बियाणे व वातावरणातील बदलांमुळे कापूस लागवड कमी झाली. पिक नामशेष झाले. आता पुन्हा काही प्रमाणात कापूस लागवड होऊ लागली आहे. हमखास पाणी नसल्याने ऊस लागवड कमी आहे. टेंभूचे पाणी फिरले तर ऊस लागवड वाढेल. परंतु पाण्याची कमतरता असल्याने ऊस लागवड वाढत नाही.

हेही वाचा- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही या ४० गावांमध्ये एकही कोरोनाबाधित सापडला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

तालुक्यात १५५० हेक्टरवर मका लागवड झाली आहे. मक्यावर ‘लष्करी’चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कृषी सहायक व कर्मचारी बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.

- पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी

अपुरे कर्मचारी...

‘लष्करी’ अळीचा पादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती होत आहे, परंतु अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अधिकारी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.

loading image