Sangli News : आष्टा पालिकेत चुरशीचे मतदान! ईव्हीएम बिघाडामुळे खंड पडला तरी मतदारांचा उत्साह कायम
EVM Malfunction Causes Delay : दुपारपर्यंत झालेल्या एकूण १३ हजार ८८६ मतदाना पैकी ७०४५ पुरुष व ६८४१ महिलांनी मतदान केले होते. सोमवारी रात्री प्रचार संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आष्टा शहरातील काही चौकात लिंबू व भंडारा टाकल्याचे आढळून आले,
आष्टा : नगरपालिका निवडणुकीसाठी आष्टा शहरात दुपारपर्यंत मोठ्या चुरशीने मतदान सुरू होते. प्रभाग तीन व नऊ मध्ये किरकोळ वादावादी सोडता, दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण ४५. ४२ टक्के मतदान झाले होते.