Ashta Shirol Election : आई आष्ट्यात, मुलगी शिरोळमध्ये विजयी; प्रभाग पाचने दिला मायलेकीला राजकीय कौल
Rare Mother-Daughter Victory : दोन वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये मायलेकीचा एकाचवेळी विजय हा महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात क्वचित पाहायला मिळणारा प्रसंग ठरला आहे.
आष्टा : नगरपालिका निवडणुकांमध्ये राजकीय वारसा आणि योगायोग यांचा दुर्मीळ संगम क्वचितच पाहायला मिळतो. आष्टा व शिरोळ या दोन वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये एकाच वेळी मायलेकीने विजय मिळवून हा अनोखा योगायोग साधला आहे.