नव्या तंत्रज्ञानाचा शोधही कलापुरातच लागेल...! 

Ashutosh Gowariker meet to kolhapur sakal office
Ashutosh Gowariker meet to kolhapur sakal office

कोल्हापूर  : कोणतीही अद्ययावत साधने उपलब्ध नसताना भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलापूर कोल्हापुरातच तयार केला होता. सध्या एखाद्या सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याला बाहेरून घ्यावे लागते. त्यामुळे असे तंत्रज्ञानही कदाचित कोल्हापूरचाच एखादा तंत्रज्ञ लवकरात लवकर सिनेसृष्टीला देईल, असा विश्‍वास आज प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केला. 

श्री. गोवारीकर यांनी आज "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सकाळ परिवारातील सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, त्यांचे आई-वडिल अशोकराव गोवारीकर, किशोरी गोवारीकर यांनीही विविध आठवणींना उजाळा दिला. "सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी त्यांचे स्वागत केले. निवासी संपादक निखिल पंडितराव यावेळी उपस्थित होते. 

"स्वदेश', "लगान' असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला "पानिपत' या सिनेमापर्यंतचा प्रवास उलगडताना त्यांनी सिनेमा आणि एकूणच समाज अशा अनुषंगांने विविध अंगांनी संवाद साधला. 
ते म्हणाले, ""सिनेमांच्या निर्मितीचा खर्च कमी करून अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी बदलते तंत्रज्ञान स्वीकारावेच लागते. पण, त्याचा नेमका किती आणि कुठे वापर करायचा, हा प्रत्येक दिग्दर्शकाचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो. मुळात आपल्याला जो विषय समाजापर्यंत न्यायचा आहे. त्याच विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यावर सिनेमा साकारण्याचे धाडस करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. आणि हे सिनेसृष्टी अधिक सजगपणे पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.'' 

बदलती अभिरूची... 
सध्या समाज प्रचंड वेगाने बदलतो आहे. तंत्रज्ञानापासून ते लोकांच्या अभिरूचीपर्यंत साऱ्याच गोष्टीही बदलू लागल्या आहे. त्यामुळे सिनेमा तयार करताना लोकांच्या अभिरूचीचा प्राधान्याने विचार करावा लागतो. साठच्या दशकातील लोकांची मानसिकता वेगळी होती. पुढे ऐंशीच्या दशकात ती आणखी बदलली. तेंव्हाच्या सिनेमातील अनेक खलनायकांना पुढे आपण नायक म्हणूनही डोक्‍यावर घेतले होते, असेही श्री. गोवारीकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com