आटपाडी गटात इच्छुकांची भाऊगर्दी 

नागेश गायकवाड - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 जानेवारी 2017

चर्चा ओबीशी दाखल्याची... 
आटपाडी गट इतर मागासवर्गीयासाठी राखीव आहे. झेडपीच्या एका माजी सदस्यांकडे कुणबी-मराठा दाखला आहे. त्याने आटपाडीतून लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे.

आटपाडी - आटपाडी जिल्हा परिषद गट ओबीशीसाठी राखीव असला तरीही इच्छुकांची भाऊगर्दी आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची उमेदवारी देण्यावरून डोकेदुखी वाढणार आहे. 

आटपाडी गट इतर मागासवर्गीयासाठी राखीव तर आटपाडी आणि कौठूळी पंचायत समिती गण खुला आहे. गटात धनगर, माळी आणि मराठा समाजाची मतदार संख्या मोठी आहे. अलीकडे तालुक्‍यातील राजकारणाला जातीचा रंग येतो आहे. इतरही समाजात जागृती झाली आहे. आटपाडीत राष्ट्रवादीत इच्छुकांची तोबा गर्दी आहे. स्वतःचे अस्तित्वही नसलेल्या मंडळीना पदाची स्वप्न पडली आहेत. राष्ट्रवादीतून बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे, सादिक खाटीक, अरुण बालटे, अशोक माळी, उपसभापती भागवत माळी, राजेश सातारकर, यु. टी. जाधव, बापू माळी यांची चर्चा आहे. भाजपातून तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, सेनेतून विजय माळी, संतोष पुजारी यांची चर्चा आहे तर विजय सातारकर यांचा पक्ष निश्‍चित नसला तरी त्यांनी रणशिंग फुंकले आहे. 

आटपाडी गण खुला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार देशमुख यांचे सुपुत्र हर्षवर्धन देशमुख यांची राजकारणात इंट्री निश्‍चित मानली जाते. सेनेतून गुरुदेव देशमुख, स्वाभिमानीतून विनायक पाटील, भाजपातून रावसाहेब पाटील यांचा मुलगा सूरज पाटील, हृषीकेश पाटील, बंडोपंत देशमुखांची नावे चर्चेत आहे. कौठूळी गणातून सरपंच शिवाजीराव कदम, हृषीकेश देशमुख, विष्णूपंत चव्हाण, अनिल कदम, अजित चव्हाण, श्रीरंग कदम, बापूसाहेब विभूते इच्छुक आहेत. 

चर्चा ओबीशी दाखल्याची... 
आटपाडी गट इतर मागासवर्गीयासाठी राखीव आहे. झेडपीच्या एका माजी सदस्यांकडे कुणबी-मराठा दाखला आहे. त्याने आटपाडीतून लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Atapadi group candidates rabble