अथणी शासकीय रूग्णालयाविरुद्ध तक्रारी; लोकायुक्त पथकाकडून धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अथणी शासकीय रूग्णालय

अथणी शासकीय रूग्णालयाविरुद्ध तक्रारी; लोकायुक्त पथकाकडून धाड

अथणी : येथील शासकीय रूग्णालयात २०१९-२०२२ पर्यंत शस्त्रक्रिया व गर्भाशय काढण्यासाठी अधिकारी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी लोकायुक्त खात्याकडे गेल्या आहेत. त्याची दखल घेऊन लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्यासह पथकाने अथणी शासकीय रूग्णालयावर बुधवारी (ता. २३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी पथकाकडून तक्रारींबाबत शहानिशा करण्यासाठी तपासणी करण्यात आली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अथणी शासकीय रूग्णालयात २०१९-२०२० या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळल्याच्या तक्रारींची गंभीर दखल लोकायुक्त खात्याने घेतली आहे. त्यामुळेच धाडसत्र राबविण्यात आले आहे. लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्यासह पथकाकडून बुधवारी सुमारे चार तास कारभाराची चौकशी व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी तेलसंग, ऐगळीला पथक रवाना झाले.

हेही वाचा: पुणे : ‘इन्स्पायर’ पुरस्कारासाठी ६ उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर निवड

अथणी शासकीय रूग्णालयात गेले अनेक वर्षे अंदाधुंद कारभार सुरू आहे. अधिकारी रूग्णांची दखल घेत नाहीत. अखेर एका व्यक्तीने लोकायुक्त खात्याकडे तक्रार दिल्याने पथकाने धाड टाकली. रूग्णांकडून विविध शस्त्रक्रियेसाठी हजारापासून पाच हजारापर्यंत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी गेल्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी अथणी शासकीय रूग्णालयाचे तालुका आरोग्याधिकारी डाॅ. बसगोंडा कागे, स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांनी शासकीय आरोग्याधिकाऱयांक़डून माहिती घेतली आहे. आता त्यांच्याकडून पुढील तपास होणार आहे. धाडीची माहिती शहरात पसरल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

Web Title: Athani Government Hospital Raid Complaint

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeHospitalbelgaum
go to top