Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश
Athani Road Accident : अथणी शहरातील अगश्य हा चौथीच्या वर्गात शिकतो. रस्त्याकडेला चालत शाळेला जात असताना शुक्रवारी सकाळी मोटारीने त्याला उडविले. त्यानंतर मोटारचालक फरारी झाला.
अथणी : शाळेला चालत जात असलेल्या दहा वर्षांच्या मुलग्याला मोटारीने उडविल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना अथणी शहरात (Athani Road Accident) शुक्रवारी (ता. ४) घडली. अगश्य विजयकुमार कनवाडी (वय १०) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.