esakal | विखेंनीच मला पाडले, नगरमध्ये हे काय बोलले आठवले 
sakal

बोलून बातमी शोधा

Athawale says I lost because of Vikhepatil

विखेंनीच मला पाडले, नगरमध्ये हे काय बोलले आठवले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले : भारतीय जनता पक्षातील नेते विखे पिता-पुत्रांना पाण्यात पाहायला लागली आहेत. माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी जाहीररित्या त्यांच्यावर शरसंधान साधले होते. आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तोफ डागली आहे. 

बघा, त्याने ड्युटीसाठी केले सपासप वार 

अकोल्यात केली खंत व्यक्त 
""शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीसाठी उभा असताना, दक्षिण नगरमधून ज्येष्ठ नेते (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही; परिणामी विजय निश्‍चित असणाऱ्या शिर्डीत माझा पराजय झाला,'' अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुगाव बुद्रुक येथील पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांच्या निवासस्थानी झाला. त्या वेळी मंत्री आठवले बोलत होते. राजाभाऊ कापसे, श्रीकांत भालेराव, काकासाहेब खंबाळकर, भीमराज बागूल, श्रावण वाघमारे, सुरेंद्र थोरात, सुनील साळवे आदी उपस्थित होते. 

सात ते आठ लाख मते मिळायला हवी होती 
मंत्री आठवले म्हणाले, ""लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. किमान सात ते आठ लाख मते मिळवून सर्वाधिक मतांनी मी विजयी होईन, असे वाटत होते. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली; परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले.'' 

पंतप्रधान मोदींनी संधी दिली 
""राजकारणात चढ-उतार, जय-पराजय होतच असतात. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मला राज्यसभेवर घेऊन मंत्री केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची शक्ती, यामुळे दलित समाज गुलामगिरी नष्ट करून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. राजकारणाचे धडे घेत आहे,'' असे आठवले म्हणाले. प्रास्ताविक शांताराम संगारे यांनी केले. 

ते येऱ्या-गबाळ्याचे काम नाही 
मंत्री आठवले म्हणाले, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष चालविणे कोण्या येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. भारतासह जगात रिपब्लिकन पक्ष पोचला. आजपासून सभासदनोंदणीचा पहिला टप्पा सुरू असून, देशात एक कोटी, तर महाराष्ट्रात 60 ते 70 लाखांवर सभासदनोंदणी करायची आहे.'' 


 

loading image