Ambedkar Statue : सांगोला चौकातील आंबेडकरांचा पुतळा मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटवला, चबुतराही केला उद्ध्वस्त; आटपाडीत तणाव
Ambedkar Statue Removed : सांगोला चौकात काही दिवसांपूर्वी आंबेडकरप्रेमींनी मध्यरात्री डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारला. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने (Revenue and Public Works Department) बंदोबस्तात मध्यरात्री पुतळा हटवला.
आटपाडी : येथील सांगोला चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. Ambedkar Statue) प्रशासनाने आज पहाटे बंदोबस्तात हटवला. चबुतराही उद्ध्वस्त केला. संतप्त आंबेडकरप्रेमींनी दिवसभर गर्दी केल्याने तणावाची स्थिती होती. पोलिस बंदोबस्त तैनात आहे.