Bazar Samiti Election : मतदान सुरू असतानाच राडा; गोपीचंद पडळकरांनी पंचायत सदस्याला लगावली कानशिलात

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (Atpadi Market Committee Election) जोरदार राडा झाला.
MLA Gopichand Padalkar beat up Gram Panchayat Member
MLA Gopichand Padalkar beat up Gram Panchayat Memberesakal
Summary

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीनं मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे.

आटपाडी (सांगली) : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (Atpadi Market Committee Election) जोरदार राडा झाला. भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका ग्राम पंचायत सदस्याच्या कानशिलात लगावलीये.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीनं मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे.

MLA Gopichand Padalkar beat up Gram Panchayat Member
Bazar Samiti Result : कोल्हापूरच्या नेत्यांनी करुन दाखवलं; बाजार समितीत 'इतक्या' जागांवर मिळवला विजय

मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झालं. तत्पूर्वी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.

MLA Gopichand Padalkar beat up Gram Panchayat Member
Barsu Refinery : 'कोकणाची वाट लावू नका'; बारसू रिफायनरी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member) मंगेश सस्ते यांना थप्पड लगावली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचं आवाहन केलं. सध्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com