Sangli News : आटपाडीत ८०% मतदानाची ऐतिहासिक नोंद; कोणाला तारण, कोणाला घात संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे!
Record 80% Voter Turnout : आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक विक्रमी मतदानाने ऐतिहासिक ठरली. ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना, तीर्थक्षेत्र, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी संयुक्त विकास आघाडी यांच्यात तिरंगी झाली.
आटपाडी : पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी ८० टक्क्यांवर मतदान झाले. २० हजार ६१४ पैकी १६ हजार ४८४ मतदान झाले. उच्चांकी मतदान कोणाला तारणार, कोणाला मारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.