Sangli News : आटपाडी निवडणुकीत सुरुवातीला शांतता, पण मतदानाच्या दिवशीच तणाव वाढला; अनेक ठिकाणी बाचाबाचीचे आणि वादावादीचे प्रकार
Atpadi Election Voting : शेवटचा आणि मतदानाचा दिवस तणावपूर्ण गेला. अनेक प्रभागांत अनेक ठिकाणी दोन दिवस बाचाबाचीचे आणि वादावादीचे प्रकार घडले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. शांततेतील निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात तणावपूर्णचे गालबोट लागले.
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी दुपारपर्यंत तणावपूर्ण वातावरणात ४५ टक्के मतदान झाले होते. निवडणूक प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा शांततेत गेला.