Political Parties Strategically Field
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Politics : एकाच घरातील उमेदवार भिडले! नात्यांच्या या राजकीय लढतीने आटपाडीकरांचे लक्ष वेधले!
Maharashtra Political News: आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा आखाडा रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. नगरपंचायतीची ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि तीर्थक्षेत्र विकास संयुक्त आघाडी अशी तिरंगी लागली आहे.
आटपाडी : असे म्हणतात की, युद्धात, प्रेमात आणि निवडणुकीच्या आखाड्यात सर्वकाही माफ असतं. त्याचीच प्रचिती आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत काही प्रभागांत आली आहे. अनेक प्रभागांत रक्ताची नाती असलेले सख्खे चुलतभाऊ, सख्खी चुलत सासू-सून, चुलत जावा-जावा आणि चुलत चुलते-पुतणे यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. रक्ताच्या नात्यातील या लढतीने शहराचे लक्ष वेधले आहे.

