Sangli Atpadi husband wife killed case
esakal
आटपाडी (सांगली) : निंबवडे (ता. आटपाडी) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना (husband kills wife over suspicion in Sangli) गुरुवारी (ता. १९) रात्री घडली. मंगल अंकुश वाघमारे (वय २८, रा. अतुना, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी तिचा भाऊ पप्पू अंतू जाधव (वय ३०) याने आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती अंकुश बाळू वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे.