Atpadi News : चार सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात; आटपाडी तालुक्यात ४२ मेगावॉट क्षमतेचे सात प्रकल्प
आटपाडी तालुक्यातील सात पैकी लिंगीवरे, माडगुळे, करगणी आणि घाणंद येथील वीज प्रकल्पांसाठी जागा अधिग्रहित करून सौर पॅनेल उभे करण्याचे काम गतीने सुरू आहे. काम मार्चअखेर पूर्ण होऊन एप्रिल ते मेपासून वीज उपलब्ध होणार आहे.
आटपाडी : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणारे आटपाडी तालुक्यातील सात पैकी चार सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पातून ४२ मेगावॉट वीज तयार होणार आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध होणार आहे.