
सांगली : मोक्यातील गुन्हेगार पवन ऊर्फ पवन्या धर्मेंद्र साळुंखे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एकजण गंभीर जखमी झाला. हा प्रकार जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवाससमोर बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडला. दरम्यान, दुसऱ्या घटनेत साळुंखे व त्याच्या साथीदाराला चारजणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात साथीदार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली.