इस्लामपूर : पेट्रोलिंग करताना मिळालेल्या माहितीनुसार भांडण झाल्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने खुनी हल्ला व दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथे घडला. शनिवारी (ता. २६) सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अतुल शंकर साळुंखे, ओंकार मोहन कदम, कांचन शंकर साळुंखे, मयूरी अतुल साळुंखे (सर्व, रा. किल्ले मच्छिंद्रगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कॉन्स्टेबल जालिंदर पांडुरंग माने यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.