
Miraj Police : मित्राशी समलैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करताना त्याला विरोध केल्याने मित्रालाच मारहाण करत तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्यात आले. आरग (ता. मिरज) येथे काल रात्री खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.