
अकोले - शहरातील स्मशानभूमीच्या कडेला खानापूर शिवारात आपल्या आत्यासह अल्पवयीन (वय-१२ वर्षे) मुलगी शेळ्या चारत होती. गळ्यात लाल पट्टीचे आयकार्ड घालून आरोपी मोटारसायकलवर त्यांच्याजवळ गेला.
हेही वाचा - या कारणासाठी घराचा दरवाजा पूर्वेला असायला हवा
सध्या कोरोना चालू आहे. तुम्ही इकडे काय करता. पोलिस तुम्हाला पकडून नेतील. थांबा पोलिसांना बोलवतो, असे म्हणत तो फोन लावण्याचे नाटक करतो. त्यामुळे ती मुलगी आणि तिची आत्या घाबरली. आत्या म्हणाली, तू जाय घरी मी शेळ्या घेऊन येते. असे म्हणून मुलीला तिने घरी पाठवले.
ती मुलगी घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. चल, मी तुला गाडीवर सोडवतो. दवाखान्यात नेतो, अशी थाप मारून त्या मुलीला गाडीवर बसवून नेले. एका उसाच्या शेतात तिला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करू लागला. तिने आरडाओरड केली. लोक जमतील या भीतीने आरोपी तेथून पळाला. त्या मुलीने घरी रडत जाऊन आपल्या नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितला.
नातेवाईक धडक अकोले पोलिसांकडे गेले. तेथे अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पो,कॉ.धनंजय गुडवाल, आनंद मैड,कैलास शिपणकर,विठ्ठल शरमाळे याच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
इतर कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी अजिंंक्य दामोधर मालुंजकर ( वय २३ रा.उचखडक खुर्द) यास अटक केली. आरोपीविरूद्ध बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कलम (पोक्सो) ८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अक्षीक दीपाली काळे व उपविभागीय पोलिस अधीक्षक रोशन पंडित यांनी अकोलेत येऊन पोलिसांना सूचना केल्या.
आरोपी आहे सहकारी संस्थेत हेल्पर
घटनेतील आरोपी मालुंजकर हा तालुक्यातील एका सहकारी संस्थेत हेल्पर म्हणून कामास आहे. त्याने त्या संस्थेतील आयकार्ड गळ्यात लटकवून अल्पवयीन मुलीला शासकीय कर्मचारी असल्याचे भासवले. कोरोनामुळे लॅाकडाउनची संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोच लॉकअपमध्ये गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.