या कारणासाठी घराचा दरवाजा पूर्वेला असायला हवा

For this reason the door to the house should be in the east
For this reason the door to the house should be in the east

नगर - वास्तूशास्त्र नेमके काय आहे, त्याचा मानवी जीवनावर किती परिणाम होतो. या शास्त्राला काही आधार आहे का, असे अनेक प्रश्न माणसाला उपस्थित होत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शास्त्राचा तज्ज्ञ डॉ. जी. ए. रत्नपारखी यांनी घेतलेला आढावा.

उपयुक्तता ः पुरातन काळामध्ये या शास्त्राचा उपयोग नगररचनेसाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र, कालांतराने "मी व माझे कुटुंब...' ही संस्कृती जसजशी वाढीस लागली, तसतसे हे शास्त्रही स्वतःच्या घरापुरते मर्यादित झालेले दिसते. 
जगातील प्रत्येक शास्त्र मानवी जीवनाला उपयुक्त आहे. निसर्गचक्राच्या नियमानुसार ज्या शास्त्राची किंवा गोष्टींची पृथ्वीला किंवा त्यावरील जीवसृष्टीला गरज नाही ते नैसर्गिकपणे संपुष्टात येतात. वास्तुशास्त्राच्या मानवाचे जीवन व आरोग्य सुकर करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. पंचमहाभूतांच्या तत्त्वाप्रमाणे निर्मित वास्तूत सकारात्मक ऊर्जेचा स्रोत अधिक असतो, तर ज्या ठिकाणी वास्तुनिर्मितीत पंचमहाभूतांच्या तत्त्वांचा विचार केलेला नसतो, त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढतो. नकारात्मक ऊर्जेचा स्रोत घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर वाईट परिणाम करताना दिसतात. 

दाहरणार्थ ः घराची रचना पूर्व-पश्‍चिम करणे आरोग्यदायी ठरते. कारण सकाळी पूर्वेकडून, तर सायंकाळी पश्‍चिमेकडून सूर्यकिरणे घरात प्रवेश करतात. सूर्यकिरणांमध्ये जंतुनाशक तत्त्वे असल्याने घरात जंतुसंसर्ग होत नाही. याउलट दक्षिण-उत्तर घरांमध्ये पूर्व-पश्‍चिमेकडून योग्य खिडक्‍यांद्वारे सूर्यकिरणांचा प्रकाश येत नसेल, तर जंतुसंसर्ग वाढल्याने आरोग्य बिघडताना दिसते. 

वास्तुशास्त्राचा मानवी भविष्याची संबंध ः माणसाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, यशापयश व आरोग्य यांचे भाकीत कुंडलीप्रमाणे सहज करता येते. विधिलिखित कोणतीही घटना बदलता येत नाही. मात्र, कर्म आणि प्रयत्नाने प्रत्येक गोष्टींची तीव्रता कमी-जास्त करता येते. 
कुंडलीतील चतुर्थ व सप्तम स्थानावरून व्यक्तींचे वास्तव्य कोणत्या प्रकारच्या वास्तूत असू शकते हे सहज समजते. एखाद्याच्या नशिबी राजयोग असेल, तर दूषित वास्तूतील वास्तव्यामुळे त्या योगात कसलाही बदल होत नाही, म्हणजेच मानवी भविष्याचा व वास्तुशास्त्राचा अजिबात संबंध नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. 
उदाहरणार्थ ः एखाद्या वास्तूत नकारात्मक ऊर्जा जास्त आहे व त्या वास्तूत 5-6 व्यक्ती वास्तव्य करीत आहे. मात्र, त्यातील एक किंवा दोन व्यक्तींना सातत्याने आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील, तर त्या तक्रारी वास्तूमुळे नसून त्या त्या व्यक्तींच्या प्रारब्धामुळे जाणवतात, हे नक्की. फक्त ज्याच्या पत्रिकेत वास्तुस्थान दूषित आहे, त्यालाच जास्त त्रास होताना दिसतो. वास्तूतील नकारात्मक ऊर्जेचा विचार करताना वर्तमान स्थितीतील "लाइफ स्टाइल' व "खाण्या-पिण्याच्या सवयींचा'ही विचार करणे महत्त्वाचे ठरते.

कारण सध्याच्या आरोग्याच्या तक्रारींचा विचार करता फार नाही, पण अगदी 40-50 वर्षांपूर्वीचा विचार केल्यास असे जाणवते की त्या काळी आजच्या इतक्‍या तक्रारी नक्कीच नव्हत्या. 
म्हणून असे सिद्ध होते, की वास्तुशास्त्राचा मानवी भविष्याशी नव्हे, तर आरोग्याशी संबंध आहे. 

- डॉ. जी. ए. रत्नपारखी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com