
कोल्हापूरात शिवप्रेमीं भडकले असून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे.
रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याबद्दल लेखक जय गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे युवक काँग्रेसतर्फे बिंदू चौकात आज दहन करण्यात आले. रायगडावर येऊन मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जय गोयल लिखित पुस्तकात मोदी यांची शिवरायांबरोबर तुलना केली आहे. त्याचे पडसाद शिवप्रेमींत उमटले असून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून युवक काँग्रेसतर्फे भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा आज प्रयत्न होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयासमोर जाण्यास रोखल्याने त्यांनी बिंदू चौकात धाव घेतली.
हेही वाचा- देशातील नवी तरुण पिढी हे सहन करणार नाही....
....अन्यथा आंदोलन सुरूच
मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला. भाजप सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय, तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोदी यांनी रायगडावर येऊन शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात यांनी दिला.
हेही वाचा- घरातील भांडणावरून बाहेर पडली आणि तीने केले हे कृत्य...
निदर्शनात स्वप्नील सावंत सचिन रावल उदय पवार वैभव देसाई मकरंद कवठेकर, आनंदा करपे, अक्षय शेळके, अॅड. कल्याणी माणगावे, दस्तगीर शेख, मोहसीन शेख, वैभव पाटील, अजिंक्य पाटील, राहित गाडीवड्डर यांचा समावेश होता.