लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात नोकरी 

अजित झळके
Monday, 26 October 2020

सांगली-  "फेसाटी' या पहिल्यावहिल्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळवून राज्यभर चर्चेत आलेले नवनाथ गोरे यांना अखेर नोकरी मिळाली आहे. भारती विद्यापीठाने त्यांनी "वरिष्ठ लिपिक' या पदावर नोकरी देतानाच "विचार भारती'चे सहसंपादकपद देऊ केले आहे.

सांगली-  "फेसाटी' या पहिल्यावहिल्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळवून राज्यभर चर्चेत आलेले नवनाथ गोरे यांना अखेर नोकरी मिळाली आहे. भारती विद्यापीठाने त्यांनी "वरिष्ठ लिपिक' या पदावर नोकरी देतानाच "विचार भारती'चे सहसंपादकपद देऊ केले आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी नवनाथ यांना बळ दिले आहे. आमदार विक्रम सावंत यांनी त्यांना नेमणुकीचे पत्र दसऱ्याच्या मुहुर्तावर सुपुर्द करत सुखद धक्का दिला. 

जत तालुक्‍यातील निगडी खुर्द येथील झोपडीत राहणारा एक तरुण लिहता झाला. जे जगलं ते त्यानं लिहलं आणि त्या पुस्तकाला मानाचा पुरस्कार मिळाला. त्याने प्रश्‍न मात्र सुटले नाही. नवनाथ यांना शेतमजुरीला जाण्याची वेळ आली. बाजरी काढायला, भांगलायला ते जायला लागले. त्यांच्या या संघर्षाची बातमी "सकाळ'ने लावली आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. आमदार विक्रम सावंत यांनी त्याची दखल घेतली. विश्‍वजीत कदम यांनी तत्काळ त्यांना भारती विद्यापीठात सामावून घेण्याची घोषणा "सकाळ'च्या माध्यमातूनच केली. त्याची दसऱ्यादिवशी पुर्ती झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Author Navnath Gore got a job at Bharati University