मिरजेत घातक शस्त्रासह रिक्षाचालकास अटक 

घनशाम नवाथे
Friday, 17 July 2020

सांगली-  मिरजेतील जवाहर हायस्कुलजवळ घातक शस्त्रासह फिरणाऱ्या सोहेल निजाम शेख (वय 31, रा. बोकड चौक, सारवान गल्ली, मिरज) या रिक्षा चालकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन सुरे, दोन कोयते, गुप्ती, कुकरी, तलवार जप्त करण्यात आली. शेखविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सांगली-  मिरजेतील जवाहर हायस्कुलजवळ घातक शस्त्रासह फिरणाऱ्या सोहेल निजाम शेख (वय 31, रा. बोकड चौक, सारवान गल्ली, मिरज) या रिक्षा चालकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन सुरे, दोन कोयते, गुप्ती, कुकरी, तलवार जप्त करण्यात आली. शेखविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिक माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हादंडाधिकारी यांनी शस्त्रबंदी आदेश दिले आहेत. त्यानुसार अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणला सूचना दिल्या आहेत. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाईसाठी खास पथक तयार केले होते. पथक आज मिरजेत पेट्रोलिंग करत असताना जवाहर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजजवळ एकजण पोत्यात घातक शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रशांत माळी व आर्यन देशिंगकर यांना मिळाली.

त्यानुसार उपनिरीक्षक प्रदीप चौधरी आणि पथकाने हायस्कुलजवळ लाल स्वेटर आणि खाकी पॅन्ट घालून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सोहेल शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर जवळ असलेल्या प्लास्टिकच्या पोत्यात आठ घातक शस्त्रे मिळाली. तीन सुरे, दोन कोयते, गुप्ती, कुकरी आणि तलवार अशी 33 हजाराची शस्त्रे मिळाली. त्याला ताब्यात घेऊन मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. आर्म ऍक्‍टनुसार त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा रिक्षा चालक म्हणून काम करतो. तो शस्त्रे कोणाला देणार होता? याची चौकशी केली जात आहे. 
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी, कर्मचारी अमित परीट, संजय कांबळे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, शशिकांत जाधव, सुनिल लोखंडे, हेमंतकुमार ओमासे, विकास भोसले, सचिन कनप, निसार मुलाणी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autorickshaw driver arrested in Miraj