
-शामराव गावडे
नवेखेड : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. याबाबत शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने तालुक्यातील ११३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्या क्षेत्रातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे अतिवृष्टीचे अनुदान मिळणार असून या रकमेची प्रतीक्षा आहे.