स्फुर्ती चौकात लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगली ः कोरूना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली आणि मिरजेतील लोकांनी आता घरातच मुक्काम ठोकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशा वेळी लोकांना सूचना आणि जिल्हा प्रशासनाचे धोरण कळविण्यासाठी स्फूर्ती चौकात लाऊडस्पीकरद्वारे माहिती पुकारली जात आहे. 

सध्या एकाच ठिकाणी हा प्रयोग सुरू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. भागातील नगरसेवक विनायक सिंहासने यांच्या पुढाकारातून ही जनजागृती केली जात आहे.

बाजारपेठा, वाहतूक, अत्यावश्‍यक सेवा याविषयीची नवीन धोरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्य शासन वेगवेगळे निर्णय घेऊन लोकांना सावध करत आहे. स्थानिक पातळीवर तातडीची माहिती लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी लाऊडस्पीकरचा उपयोग केला जात आहे. त्यानुसार स्फूर्ती चौकात काम पूर्ण झाले असू दुपारपासून ही जनजागृती केली जात आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness through loudspeakers