बाप रे.. कोरोना  रूग्णालय परिसरात साप च साप ः वाचा कुठे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

मिरज (सांगली) ः शहरातील जिल्हा कोरोना रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी डॉक्‍टर परिचारीका आणि अन्य कर्मचारी जिवाची बाजी लाऊन काम करीत आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयाचा परिसर मात्र कमालीचा अस्वच्छ बनला आहे. रुग्णालय इमारतीनजिकच वाढलेली झुडपे, दुरूस्तीवेळी ठेकेदारांने बाहेर टाकलेला राडारोडा यामुळे सापांचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी तर थेट रूग्णालयातच साप शिरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

मिरज (सांगली) ः शहरातील जिल्हा कोरोना रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी डॉक्‍टर परिचारीका आणि अन्य कर्मचारी जिवाची बाजी लाऊन काम करीत आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयाचा परिसर मात्र कमालीचा अस्वच्छ बनला आहे. रुग्णालय इमारतीनजिकच वाढलेली झुडपे, दुरूस्तीवेळी ठेकेदारांने बाहेर टाकलेला राडारोडा यामुळे सापांचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी तर थेट रूग्णालयातच साप शिरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

मिरज रुग्णालय परिसरात उघड्यावर पडलेला जैवकचरा यामुळे रुग्णालयाचा परिसर रुग्णांसाठीच नव्हे तर डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांसाठीही कमालीचा धोकादायक बनला आहे. रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात वाढलेली झुडपे आणि साठलेल्या कच-यांच्या ढिगामुळे रुग्णालय परिसरात साप, उंदिर, घुशी, यासारख्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. 

कोरोनावरील उपचारांसाठी जिल्हा कोरोना रुग्णालय म्हणुन मिरजेच्या शासकीय रुग्णालयास स्वतंत्र दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासुन रुग्णालयाच्या अतंर्गत स्वच्छतेकडे अतिशय गांभिर्याने लक्ष दिले गेले. पण याच वेळी रुग्णालय परिसरातील स्वच्छतेकडे मात्र रुग्णालय प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होते आहे. मध्यंतरी शहरातील काही सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाचा परिसर स्वंयस्फुर्तीने स्वच्छ केला पण अलीकडे मात्र रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर झाल्याने सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांचे रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. 

अर्थात कोरोनासाठी आलेल्या निधीतुन तरी रुग्णालय प्रशासनाने परिसराची स्वच्छता करुन घेणे गरजेचे होते. किंबहुना परिसरात उघड्यावर पडलेला जैव कचरा, इमारतीशेजारीच ठेकेदारांनी टाकलेला राडारोडा, आणि वाढलेली झुडपे काढुन घेऊन रुग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे होते. पण तसे घडले नाही. 
----------------------------------- 
कोट 

शासकीय रुग्णालय परिसराचा अक्षरशः उकिरडा झाला आहे. परिसराच्या स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराचा प्रशासनावर दबाव आहे. त्यामुळेच रुग्णालय प्रशासन रुग्णालयात, वसतीगृहात साप येईपर्यंत गप्प राहते. वास्तविक रुग्णालय प्रशासनाने गप्प राहण्याचे काही कारण नाही. ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर आम्ही रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करु पण त्यानतंर ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनास याबाबत खुलासा करावा लागेल. 

डॉ. महेशकुमार कांबळे, 
मिरज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baap Re .. Snake in Corona Hospital area: Read where