डॉ. आंबेडकर कमान वादावर तोडगा निघणार? चौकशी समितीनं बेडगकरांचं ऐकून घेतलं म्हणणं, पंधरा दिवसांत देणार अहवाल

बैठकीवर काही जणांकडून बहिष्कार, जिल्हा परिषदेसमोर मोठा पोलिस बंदोबस्त
Babasaheb Ambedkar Arch Dispute Inquiry Committee
Babasaheb Ambedkar Arch Dispute Inquiry Committeeesakal
Summary

काही जणांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती. त्यांचेही म्हणणे जाणून घेणे आवश्‍यक असल्याने समिती मंगळवारी बेडगला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग (Miraj Bedag) येथील कमान पाडण्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काल ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) पुन्हा बेडगमध्ये जाऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेणार आहे.

या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी सांगितले.

Babasaheb Ambedkar Arch Dispute Inquiry Committee
Kolhapur : पावसाने भिंत कोसळून राहत्या घरात महिलेचा मृत्यू; मतिमंद रोशन झाला अनाथ, घटनेमुळं पंचक्रोशीत हळहळ

बेडग स्वागत कमान प्रकरणी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

या समितीने काल जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात बेडग ग्रामस्थांना निमंत्रित केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितीचे माजी सदस्य, आजी-माजी सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यापैकी काहींनी तोंडी तर काहींनी लेखी म्हणणे सादर केले. समितीने म्हणणे मांडण्यासाठी दोन्ही गटांना बोलवले होते.

Babasaheb Ambedkar Arch Dispute Inquiry Committee
Whatsapp ला I'm Sorry असा स्टेटस् ठेऊन दाम्पत्यानं केली गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

मात्र, काही जणांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती. त्यांचेही म्हणणे जाणून घेणे आवश्‍यक असल्याने समिती मंगळवारी बेडगला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता जिल्हा परिषदेसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ म्हणणे मांडण्यासाठी आले होते. आणखी काही ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी समिती मंगळवारी बेडग येथे जाणार आहे. दोन्ही बाजूंच्या ग्रामस्थांशी बोलून त्यांचे म्हणणे घेणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

Babasaheb Ambedkar Arch Dispute Inquiry Committee
बारा फूट ओढ्यात कार कोसळून दोन मित्र ठार; क्षणार्धात दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा, लहान बहिणीचा आक्रोश मन हेलावणार

यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिरजे, मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, गटविकास अधिकारी संध्या जगताप आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com