esakal | बाळ-बाळंतिण सुखरूप पोचली घरी...
sakal

बोलून बातमी शोधा

Baby & mother reaches home safely ...

खंडेराजूरी (ता. मिरज) येथील महिला शुक्रवारी दुपारी दोन दिवसाच्या बाळासह विजापूर वेस येथे बराचवेळ वाहनाची वाट पहात उभी होती. ही माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी आयुष हेल्पलाईनच्या रुग्णवाहिकेतून तिला सुखरुप घरी पोचवले.

बाळ-बाळंतिण सुखरूप पोचली घरी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : खंडेराजूरी (ता. मिरज, जि. सांगली) येथील महिला शुक्रवारी दुपारी दोन दिवसाच्या बाळासह विजापूर वेस येथे बराचवेळ वाहनाची वाट पहात उभी होती. ही माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी आयुष हेल्पलाईनच्या रुग्णवाहिकेतून तिला सुखरुप घरी पोचवले. सामाजिक कार्यकर्त्यांसह उपायुक्तांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

खंडेराजूरी येथील गरोदर महिला मिरज शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी आठवड्यापूर्वी दाखल झाली होती. ती दोन दिवसांनी प्रसूत झाली. त्यानंतर शुक्रवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र, कोणतीच वाहने रस्त्यावर फिरत नसल्याने ती आपल्या आई व दोन दिवसाच्या बाळासह चालत विजापूर वेस येथे बस थांब्यावर आली.

या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे, श्री. कापसे, तानाजी रुईकर, संजय ताटे, चंद्रकांत मैगुरे, रवी कांबळे यांना ही माहिती समजली. त्यांनी विजापूर वेस येथे जाऊन संबंधित महिलेची विचारपूस केली. तिला व तिच्या आईला जेवण दिले. तसेच काही किराणा माल खरेदी करून दिला. या महिलेची माहिती त्यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना दिली. 

स्मृती पाटील यांनी आयुष हेल्पलाईन टीमच्या अविनाश पवार यांना ही माहिती देऊन वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. अविनाश पवार यांनी रुग्णवाहिका देऊन महिलेला तिच्या गांवी पोचविले. सर्वत्र संचारबंदी सुरू असताना सामाजिक संवेदनशीलतेतून उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. 

loading image
go to top