तब्बल तीन दशकांनंतर बहादूरवाडी धरणग्रस्तांना मिळाला न्याय;  84 लाख निर्वाह भत्ता वाटप

महादेव अहिर
Monday, 18 January 2021

तब्बल तीन दशके न्यायापासून वंचित चांदोली बुद्रुकच्या 84 कुटुंबाना आज न्याय मिळाला.

वाळवा (जि. सांगली) : तब्बल तीन दशके न्यायापासून वंचित चांदोली बुद्रुकच्या 84 कुटुंबाना आज न्याय मिळाला. चांदोली धरण आणि अभयारण्य ग्रस्त संग्राम संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज या कुटुंबाना तब्बल 84 लाख बारा हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळाला. संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे धरणग्रस्त वसाहतीत आज निधीचे समारंभपूर्वक वाटपही झाले. 

चा×दोली धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्ताना उदरनिर्वाहभत्ता म्हणून शासनाने सुमारे सव्वा पाच कोटी रुपये दिले आहेत. मात्र किचकट निकषांमुळे चा×दोली बुद्रुक हे गाव या योजनेत समाविष्ट करण्यात आले नव्हते. उदरनिर्वाह भत्ता या गावातील कुटुंबाना मिळाला पाहिजे म्हणून स×घटनेने सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर आणि कराडच्या वन कार्यालयाचे अधिकारी एम.एन.मोहिते यांनी यासाठी शासकीय पातळीवर कागदोपत्री पुरावे सादर केले.

त्यानंतर अखेर चा×दोली बुद्रुकच्या 84 कुटुंबाना न्याय मिळाला. त्यापैकी दहा कुटुंबे अजूनही निकषांवर अपात्र आहेत. उर्वरित कुटुंबाना तब्बल 84 लाख 12 हजार रुपये मिळाले. प्रत्येक कुटुंबाला एक लाख 18 हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम मिळाली आहे. गौरव नायकवडी यांच्या हस्ते हा निधी धरणग्रस्ताना सुपुर्द करण्यात आला. यावेळी मुसा मुल्ला, श्रीपती पाटील, उमेश कानडे, एकनाथ पाटील, मारुती पाटील, सुरेश नांगरे, सुरेश जाधव उपस्थित होते. 

दरम्यान, योजनेत समावेश न झालेल्या दहा कुटुंबाबाबत आठ दिवसात निर्णय होईल, असे जिल्हा पुनर्वसन अधिका-यानी सांगितले. धरणग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता मिळाला पाहिजे म्हणून क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सन 1995 मध्ये राज्य शासनाकडे जोरदार मागणी केली होती. तत्कालीन मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी अनुकूल प्रतिसाद दिला.

मात्र शासनाकडे एवढा निधी उपलब्ध नाही, असे त्यावेळी सांगण्यात आले. नागनाथअण्णा नायकवडी यांनी निधी वाटपाची प्रातिनिधिक सुरवात करताना हुतात्मा कारखान्याचे सात लाख रुपये शासनाला उसणे म्हणून दिले. ही आठवण धरणग्रस्त नेत्यांनी सांगितली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahadurwadi dam victims get justice after three decades; 84 lakh subsistence allowance allotment