esakal | कोल्हापूर झेडपीत अखेर सत्तांतर, काॅंग्रेसने डाव जिंकला
sakal

बोलून बातमी शोधा

bajrang patil elected on kolhapur jilha parishad result.jpg

कोल्हापूर जिल्हा परिषदेत अखेर सत्तांतर झाले आहे. भाजपला शह देत महाविकासआघाडीने आपली सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काॅंग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्.यपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड झाली आहे. 

कोल्हापूर झेडपीत अखेर सत्तांतर, काॅंग्रेसने डाव जिंकला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा परिषदेत अखेर सत्तांतर झाले आहे. भाजपला शह देत महाविकासआघाडीने आपली सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काॅंग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्.यपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड झाली आहे. 

बजरंग पाटील यांनी भाजपच्ा अरुण इंगवले यांचा पराभव केला. पाटील यांना  ४१ तर इंगवले यांना २४ मते मिळाली.  सतिश पाटील यांना ४१ मते मिळाली तर भाजपच्या राहुल आवाडे यांना २४ मते मिळाली

भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केले नाही. तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील मतदानाला गैरहजर राहिले. 

हे पण वाचा - सरकार नाही भानावर, महिला बसल्या पाण्यावर

आज दूपारी दोन वाजता पिठासन अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरूवात झाली. त्यांनी अजर् छाननीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अजर् दाखल केलेल्या उमेदवारांना माघारीसाठी  दहा मिनिटांचा वेळ दिला. यावेळेत उमेदवारांनी अजर् माघरी न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. यात काॅंग्रेसच्या पाटील यांचा विजय झाला. 

पक्षीय बलाबल

कॉग्रेस -१४

राष्ट्रवादी -१०

शिवसेना -१०

शेतकरी संघटना -०२ 

शाहू आघाडी _ ०२

अपक्ष -०१

चंदगड विकास आघाडी- ०१

ताराराणी आघाडी - ०१

एकूण -४१

भाजप आघाडी
भाजप -१३

आवाडे गट -०२

चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१

जनसुराज्य - ०६

ताराराणी आघाडी ०२

एकूण -२४
 

loading image