देवेंद्र फडणवीस यांनी नवीन ज्योतिषी शोधावा : थोरात 

Balasaheb Thorat criticizes Fadnavis marathi news
Balasaheb Thorat criticizes Fadnavis marathi news

नगर : ""विधासभा निवडणुकीत 220च्यावर जागा येतील. "मी पुन्हा येईल', महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही, अशी भविष्यवाणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा. त्यांची सर्वच्या सर्व भविष्यवाणी "फेल' होत आहे. विरोध करणे, हा एकमात्र विरोधकांचा पिंड आहे. भाजपने आयारामांच्या झुंडीच्या झुंडी पक्षात घेतल्या. त्यांना सांभाळण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. त्याचेच फळ म्हणून जिल्हाध्यक्ष निवडीवरून सध्या भाजपमध्ये हाणामारी सुरू आहे. यानिमित्ताने भाजपच्या अधोगतीला सुरवात झाली आहे,'' असा हल्लाबोल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, ""राज्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांमध्ये सहजता आणणे हा उद्देश आहे. त्यात मालमत्तासंदर्भात नागरिकांना लागणारी कागदपत्रे सहजतेने उपलब्ध होऊ लागली आहेत. मागील सरकारच्या काळात त्यात गती राहिली नव्हती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी पुरोगामी विचारांचे आहे. कॉंग्रेसची राजनीतीही राज्यघटनेला धरून आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे, लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. हा घटनेचा आपण निषेध करतो. नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ नये, या मताशी आम्ही ठाम आहे.'' 

शेतकऱ्यांसाठी आणखी योजना राबविणार

""विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मागील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. त्यात भरमसाठ अटी, शर्तीची माळ घातली. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही; परंतु महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही अटी, शर्ती न घालता दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. दोन लाखांपुढील कर्ज, नियमित फेड करणारे शेतकरी यांच्यासाठीही सरकार योजना आणणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,'' असे थोरात यांनी सांगितले. 

पालकमंत्रीपदाची धूरा नकोच

पालकमंत्री निवडीबाबत थोरात म्हणाले, ""महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. महसूलमंत्रीपद आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद मला नकोच आहे. स्थानिक पालकमंत्रीपद मिळाले नाही, म्हणून कोणतीही नाराजी नाही. त्याऐवजी पक्षाने तरुणांना ही जबाबदारी द्यावी, हाच त्यामागील हेतू आहे.'' 

पाया खोदला, आता कळसही उभारू 

""नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम 28 कोटींच्या निधीअभावी मागील पाच वर्षांत रखडले आहे. नूतन इमारतीचा पाया आपणच खोदला होता. आता त्याचा कळसही आपणच चढविणार आहोत. लवकरच नूतन इमारतीच्या निधीचा प्रश्‍न मार्गी लावू. इमारतीचे उद्‌घाटनही आपल्याच हातून होईल,'' असा ठाम विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com