
-सुरेश धोत्रे
बांबवडे : येथील ज्येष्ठ व प्रगतशील शेतकरी रघुनाथ शंकर पवार यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये दोन एकर क्षेत्राची मशागत करून केळी लागवड केली होती. दोन एकर बागेला चार लाख रुपये खर्च आला. केळीची बाग डौलदार आली आहे. आता येथून उत्पादित केळी इराक व इराणला निर्यात केली जात आहे.