`या` झेडपीत ठेकेदार लॉबीला दणका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

सांगली, ता. 7 ः जिल्हा परिषदेतील बांधकाम वाटपातील ठेकेदारांच्या लॉबीला आज जोराचा दणका देत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी नवी पद्धत रुजवली. 245 बांधकामांसाठीचा ठेका देताना सदस्यांची शिफारस घेण्याची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली. ठेका मागणाऱ्या सर्व ठेकेदारांना ड्रॉ पद्धतीने काम देण्यात आले. गुडेवार यांच्या या षटकाराने जि. प. सदस्य मात्र चांगलेच घायाळ झाले आहेत. त्यांनी या पद्धतीला विरोध करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषदेत दर तीन महिन्यांनी कामांचे वाटप केले जाते. त्यात तीन लाखांच्या आतील कामे ही थेट दिली जातात. त्यावरील कामांसाठी ई-निविदा मागवली जाते. थेट कामे देताना सदस्यांच्या शिफारसी घेऊन काम देण्याची पद्धत रुढ झाली होती. त्यातून लॉबिंग सुरु झाले होते. प्रत्येक सदस्याने आपला ठेकेदार नेमला होता. त्यामुळे कामाच्या वेगापासून ते दर्जापर्यंत सारे आलबेलच होते. श्री. गुडेवार यांनी ही घडी मोडून टाकत लॉबिंगला मोठा दणका दिला आहे. त्यांनी सर्वांना काम मिळेल, तालुक्‍यातीलच ठेकेदार नेमला जाईल, अशी व्यवस्था केली. एका कामाची दोघांनी मागणी केल्यास टॉस टाकून काम वाटप करण्यात आले. मजूर सोसायट्या आणि सुशिक्षित बेरोजगारांनी बांधकाम विभागासमोर एकच गर्दी केली होती. दिवसभर याची चर्चा होती.
या पद्धतीला काही सदस्यांनी विरोध करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात श्री. गुडेवार यांनी चुकीच्या पद्धतीने कामाचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ही जिल्ह्यासाठी आहे आणि मजूर सोसायट्याही जिल्ह्यात काम करतात. असे असताना तालुका निहाय काम वाटपाची गरज काय होती? ही पद्धत चुकीची आहे, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे हे वाटप रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

त्यावर श्री. गुडेवार म्हणाले, ""मी काम वाटप समितीचा अध्यक्ष आहे. हा माझा विषय आहे. काही अडचण असतील तर सीईओंशी चर्चा करेन.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangs on contractor lobby in sangli zp